मुंबई : महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढणार की वेगवेगळं याबाबत अजूनही स्पष्ट झाले नाही. यातच आता सुप्रिया सुळे यांनी याबाबद मोठे विधान केले आहे. कोरोना काळामध्ये ज्याप्रकारे मुंबई महानगरपालिकेने काम केलं आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार आणि शिवसेनेचा महापौर बसणार आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन टीका केली आहे.
“मुंबईत पूर्वी पदपथावर पोपट घेऊन बसणारे कुडमुडे ज्योतिषी दिसत होते, हल्ली ते असे क्वचितच दिसतात. त्यातही महिला कुडमुडी ज्योतिषी भेटणे म्हणजे मुंबईकरांची पूर्वजन्मीची पुण्याईच फळाला आली म्हणायची”. अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे.
मुंबईत पूर्वी पदपथावर पोपट घेऊन बसणारे कुडमुडे ज्योतिषी दिसत…
हल्ली ते असे क्वचितच दिसतात.
त्यातही महिला कुडमुडी ज्योतिषी भेटणे म्हणजे मुंबईकरांची पूर्वजन्मीची पुण्याईच फळाला आली म्हणायची… pic.twitter.com/xy7RWqA6yH— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 17, 2022
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?
सुप्रिया सुळे यांनी आज धुळे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची येईल? तुम्हाला काय वाटत ? असे प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना सुपिया सुळे म्हणाल्या, शिवसेनेचीच सत्ता मुंबईत येईल व शिवसेनेचाच महापौर होईल. मुंबई महापालिकेकडून कोरोना काळात चांगले काम झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

