पुणे : पुण्यात वारजेमध्ये आज अडकून पडलेल्या मजुरांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी मजुरांनी आम्हाला आमच्या घरी जाऊद्या अशी मागणी केली. यावेळी शेकडोच्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले होते. तर यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
घरी जाण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ परप्रांतीय मजुरांनी गर्दी केली होती. अचानक मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पंगावले. त्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला.
काही वेळानंतर या सर्व परप्रांतीय नागरिकांना एका मोकळ्या शेडमध्ये घेऊन जात या सर्व नागरिकांची नावे नोंदवून घेण्यास सुरुवात केली, अशी माहिती पोलीस अधिकारी अशोक कदम यांनी दिली आहे. केंद्र सरकारने सर्व मजुरांना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी दिल्याने आता सर्वजण घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
परप्रांतीयांना आपापल्या राज्यात सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. अशा नागरिकांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे नावनोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ उत्तरप्रदेशच्या नागरिकांनी गर्दी केली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

