पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरात ७ हजारांच्या आसपास रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदवण्यात आली होती. आता ही स्थिती आटोक्यात आली असून शहरातील बहुतांश निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
दरम्यान, पुणे शहरात आज नव्याने २२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८९ हजार ७३२ इतकी झाली आहे. तर, १४२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७८ हजार ७७१ झाली आहे.
कोरोना टेचाचणीचे प्रमाण कमी न करता कायम ठेवण्याचे आव्हान प्रशासन सध्या पेलत असून आज एकाच दिवसात ९ हजार ४८५ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २९ लाख ७७ हजार २८१ इतकी झाली आहे. सध्या पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार १२९ रुग्णांपैकी २०४ रुग्ण गंभीर तर ३२५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. नव्याने ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८३२ इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- बाप्पा कोरोना घालव रे…! पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला महत्वाचा निर्णय
- मोठी बातमी! केंद्र सरकार काश्मीर खोऱ्यातील हिंदूंच्या मालमत्ता परत करणार
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

