पुणे : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर आता पुण्यातील आकडा हा 800 पार गेला आहे. मुंबई आणि पुणे ही प्रमुख शहर कोरोनाची केंद्रस्थान बनली आहेत. या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा लक्षणीय आहे. यापार्श्वभूमीवरच राज्य सरकारकडून या दोन्ही शहरांना लॉकडाऊन करण्यात आले आहे.
आज पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 800 पार गेला असून रुबी हॉल क्लिनिकच्या 25 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 16 नर्स, 3 डॉक्टर आणि इतर 6 कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 803 वर पोहोचला आहे.
याअगोदरही पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील काही नर्सचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे इतर 25 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर आता यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणांवर असणार आहे.
दरम्यान राज्यातील करोनाबाधितांची संख्या ४६६६ वर पोहोचली आहे. सोमवारी नवीन ४६६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत 572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी नऊ तर आतापर्यंत २३२ रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. दुसरीकडे मुंबईतील करोनाबधितांचा आकडा 3090 वर गेला आहे. 24 तासांत 155 नवीन रुग्ण आढळले आहेत.
…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा | Can CM Gives His Resign ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

