Share

आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात ३५ जागा जिंकू : प्रफुल्ल पटेल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व समविचारी पक्षांची महाआघाडीबाबत चर्चा झाली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. शेवटची बैठक कॉग्रेसचे नेते खर्गे यांच्यासोबत होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना दिली. मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही असेही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

गुरुवारी राष्ट्रवादीची संसदीय समितीची बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्रातील लोकसभेच्या संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा झाली, काही इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारीवर चर्चा करण्यात आली.येत्या चार-पाच दिवसांत अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करू असे ते बोले.देशात सर्वच स्तरातून विद्यमान भाजप सरकारवर तीव्र असंतोष आहे. त्यामुळे आमची आघाडी राज्यात ३५ जागा जिंकेलच असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

तसेच प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याचा आमचा विचार आहे. पण राजकारणात एका हाताने टाळी वाजत नाही, आम्ही अजूनही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत अशी माहिती यावेळी पटेल यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!