Share

भारतातदेखील तालिबानी जिंकत आहेत, ‘त्या’ मारहाणीवर कॉंग्रेसचा आरोप

Published On: 

मुंबई: कानपूर येथे महिलेला जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला बजरंग दलाकडून चोप दिल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीवर हल्ला केल्याप्रकरणी तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला रस्त्यावर मारहाण करत ‘जय श्री राम’ चा जयघोष करण्यास प्रवृत्त केल्याचे बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाना साधला आहे.

‘तालिबानी जिंकतायत. अफगाणिस्तानात आणि भारतात सुद्धा’ अशा आशयाचे ट्विट नितीन राऊत यांनी केले आहे. दरम्यान अफगाणिस्तान येथे महिलांची तसेच नागरिकांची अनेक कारणावरून तालिबानी संघटनेकडून हत्या करण्यात आली. याठिकाणी तालिबानी संघटनेचा प्रभाव अधिक दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाना साधत अफगाणिस्तान आणि भारत देशात असाच अत्याचार होत असल्याचे म्हटले आहे. यावरून नितीन राऊत यांनी केंद्रावर निशाना साधला आहे.

नितीन राऊत यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. सदरील घटना बुधवारी कानपूरच्या वरुण विहार परिसरात घडली. या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली, तेव्हा ही घटना उघडकीस आली.यामध्ये अल्पवयीन मुलगा रडत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या वडिलांना वाचवण्यासाठी तो आरडाओरड करताना दिसून येत आहे. नंतर त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकारनावरून कॉंग्रेसने पुन्हा एकदा केंद्रावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!