गडचिरोली : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला कोरोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. आता गडचिरोलीत संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असलेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) ७२ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी एकूण ७३ जण कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. पोलीस विभागातील मुंबईहून परतलेला इतर एकजण तर गडचिरोलीत संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असलेल्या एसआरपीएफचे ७२ जवान कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे आज एकूण ७३ जण कोरोना बाधित आढळले आहेत, तर ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना मुक्त रुग्णांची संख्या ११३ वर पोहोचली आहे.
गडचिरोली एकूण कोरोना बाधितांची संख्या २७९ वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १६५ असून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याबाहेरील रहिवासी पण जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ५१ वर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ३३० वर पोहोचली आहे.
राज्यातील आणखी एका जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन
धक्कादायक : नागपूरमध्ये ‘त्या’ एका व्यक्तीमुळे ४० जणांना झाला कोरोना
राज्याच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 1602 वाढ, एकूण आकडा 27 हजार 524 वर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

