Share

धक्कादायक : नागपूरमध्ये ‘त्या’ एका व्यक्तीमुळे ४० जणांना झाला कोरोना

Published On: 

नागपूर : करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा तांडव जगभर सुरू आहे. नागपुरात देखील या विषाणूमुळे अनेकजण त्रस्त असल्याचे समोर येत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात आणखी नऊ जणांना करोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे आता नागपुरातील करोना बाधितांच्या संख्येने ६३ वरून थेट ७२ वर उसळी घेतली आहे.

नागपूरसाठी सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, करोनाची लागण झालेल्या एकूण ७२ रुग्णांपैकी जवळजवळ ४० जण हे उपचारादरम्यान मेयोत दगावलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आल्याने बाधित झाले आहेत असं वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले आहे . एकाच व्यक्तीमुळे इतक्या मोठ्या संख्यने करोनाची लागण होण्याचा हा बहुधा देशातील उच्चांकी आकडा आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी ३२८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, करोनाबाधित रुग्णसंख्या ३६४८वर गेली आहे. गेल्या २४ तासात ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील पाच, पुण्यातील चार आणि ठाणे व औरंगाबाद महापालिका हद्दीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यात एकूण करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या २११ झाली आहे.

दरम्यान, मुंबईत कोविड 19च्या रुग्णांमध्ये दररोज भर पडत असली, तरी दररोज सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. मंगळवारी, १४ एप्रिलला बाधितांची संख्या २०४ होती. त्यानंतर ही संख्या टप्प्याटप्प्यानं घटत गेली. काल १७ एप्रिलला ७७ नवे रुग्ण आढळले. कोरोनामुक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत धारावीमधली कोरोनाबाधितांची संख्या आता शंभरच्या पुढं गेली आहे.

या पार्श्वभूमीवर खास धारावीसाठी आजच डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांची तातडीची भरती होत आहे. काल १५ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांची संख्या आता १०१ झाली आहे. शिवाय १० रुग्ण मरण पावले आहेत. मुंबईतल्या आंग्रे नौदल तळावरच्या २१ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं आढळलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!