मुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने भर पडली आहे. गेल्या 24 तासात 1602 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नवीन कोरोनाबाधित रुग्णांसह राज्यातील एकूण संख्या 27 हजार 524 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात 512 रुग्णांनी कोरोनावर मात असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
तर मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकट्या मुंबईची कोरोनाबाधितांची संख्या आता 16 हजार 738 वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत तब्बल 621 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 314 वर पोहोचली आहे. तर 175 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तसेच देशातील कोरोनाबाधितांची 81 हजार 997 वर पोहोचली आहे. तर त्यापैकी 27 हजार 969 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 45 लाख 25 हजार 420 एवढी झाली आहे. तर त्यापैकी 3 लाख 3 हजार 372 मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
’20 लाख कोटी रुपयांच्या जाहीर केलेल्या महापॅकेजचे जनता स्वागत करीत आहे ‘
उदगीर : कोरोनाबाधित रुग्णांची तब्येत चांगले असल्याने 19 मे पर्यंत सर्वांना घरी सोडण्यात येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

