औरंगाबाद : राज्य शासनाने संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केल्यानंतरही कर्मचारी संप वर ठाम आहेत. दुसरीकडे प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. सेवा समाप्ती, निलंबन अशा प्रकारची कारवाई चालू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या कारवाईची धास्ती घेतली असून, अशा परिस्थितीत गंगापूर आगारातील एका वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कैलास विश्वनाथ तुपे (वय ४९, रा. भेंडाळा, ता. गंगापूर) असे या वाहकाचे नाव आहे.
एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा करून संप मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतरही हा संप अद्याप सुरूच आहे. एस. टी. प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांवर क कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गंगापूर आगारातील ९ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यापैकी ५ कर्मचाऱ्यांना २८ नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले आहे.
आता माझ्यावरसुद्धा कार होईल, अशी धास्ती गंगापूर आगरातील वाहक कैलास विश्वनाथ तुपे यांनी घेतली होती. त्यातच तुपे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी औरंगाबादला घा टीत दाखल करण्यात आले होते. आज २९ नोव्हेंबर रोजी तुपे यांचे निधन झाले. या घटनेमुळे एस. टी. कर्मचाऱ्यांत प्रशासनावि षयी रोष वाढत आहे. कैलास तुपे हे गेल्या काही दिवसांपासून काम बंद असल्यामुळे अस्वस्थ होते. ते कर्जबाजारी झाले होते. तसेच एस. टी. प्रशासनाकडून आपल्यावरही निलंबनाची कारवाई होईल, अशी भीती त्यांना होती. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देवोलिना भट्टाचार्जीवर भडकला सलमान खान, म्हणाला….
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- अश्विनने मोडला हरभजनचा मोठा विक्रम; ट्विट करत केले अभिनंदन
- कानपूर कसोटीत अश्विनचा बोलबाला; टॉम लाथम बाद होताच रचला इतिहास

