Share

राज्याच्या मंत्रिमंडळाची आज 5 वाजता महत्वपूर्ण बैठक, लॉकडाऊनबाबत चर्चा होण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरच्या नियुक्ती बाबत आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. यामध्ये मंत्रिमंडळासह सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री सहभागी होणार आहे.

आजचं पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी लॉकडाऊन बाबत चर्चा करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सायंकाळी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. तर टप्प्याटप्प्यानं लॉकडाउन उठवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यातील कोरोनाची परिस्थिती, राज्यासमोरील आर्थिक आव्हान, आणि राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या प्रस्तावावर अजून स्वाक्षरी केलेली नाही, या विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याआधीही पंतप्रधान मोदींशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाशी चर्चा करून राज्याचा लॉकडाऊनचा कालावधी वाढवला होता.

त्याचप्रमाणे याही बैठकीत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्हे हे कोरोनामुक्त झाले असले तरी मुंबई – पुणे ही महत्वाची शहरंं मात्र कोरोनाचे घर बनले आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ही शहरंं अजून पुढेचे काही दिवस लॉकडाऊनमध्ये ठेवणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे आर्थिक चक्र पूर्णपणे बिघडले आहे. त्यामुळे काही भागातील उद्योगधंदे सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला होता. मात्र  ज्या भागात मोठ-मोठे उद्योगधंदे होते त्याभागातचं कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने जे कारखाने सुरु होईला हवे होते ते मात्र झाले नाही. त्यामुळे या सर्व प्रमुख मुद्यांवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा | Can CM Gives His Resign ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!