Share

आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व प्रवर्गाचे प्रशिक्षण तातडीने सुरू करा

Published On: 

लातूरः राज्यभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला आहे. हा फैलाव असाच वाढत राहिल्यास राज्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आतापासूनच प्रशिक्षित मनुष्यबळ तयार ठेवावे आणि या करीता खासगी क्षेत्राची मदत घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचित केले आहे.

दरम्यान, चीन, इटली, अमेरिका, स्पेन सारख्या देशात जशी परिस्थिती उद्भवली आहे तशी परिस्थिती राज्यात उद्भवल्यास आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात लागणार आहे.त्यासाठी मेडिकल, पॅरामेडिकल, नॉन मेडिकल आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने तातडीने सुरू करावे, अशी सूचना देशमुख यांनी लातूर जिल्हा प्रशासनाला दिल्या.

त्याचप्रमाणे, खासगी क्षेत्रात कार्यरत असणारे वैद्यकीय व्यावसायिक, आयुष डॉक्टर, खासगी क्षेत्रातील लॅब टेक्निशियन, पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ त्याचप्रमाणे एनसीसी, एनएसएस, आणि नेहरू युवक केंद्रामधील स्वयंसेवक, निवृत्त वैद्यकीय व्यावसायिक, लष्करातील निवृत्त डॉक्टर, माजी सैनिक, रेडक्रॉस, ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी, रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन इत्यादी क्षेत्रातील सर्वांच्या सेवा देणाऱ्या प्रत्येक प्रवर्गासाठी प्रशिक्षण तातडीने सुरू करावे,अशा सूचनाही अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!