Share

मी पुन्हा येईन म्हणायची मला भिती वाटते…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  ‘ मला मी पुन्हा येईल म्हणायची भिती वाटते . मात्र असे काम करून दाखवील कि पुढच्यावेळी विकास कामाच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादाने कॅबिनेट मंत्रीपद मिळेल , असे चांगले काम आपण करु अशी ग्वाही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे राहुरी येथे म्हणाले.विधानसभा निवडणूकीत राहुरी तालुक्याने मला खूप प्रेम दिले. हे प्रेम आणि दाखवलेला विश्वास मी कधीही विसरणार नाही आणि येत्या काळात चांगल्या प्रकारचं काम आपण करून दाखवू.

राहुरी नगरपालिका आणि राज्यात आपलेच सरकार आहे त्यामुळे वेगाने विकास करता येईल. राहुरीतील  अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला ग्रामीण रुग्णालयाचा तसेच एमआयडीसीचा विस्तार व विकास कसा करता येईल . यासाठी मी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही यावेळी नामदार तनपुरे यांनी दिली .

जरी माझे शिक्षण अमेरिकेत झाले असले तरी माझे माध्यमिक शिक्षण राहुरी येथील मराठी माध्यमाचा शाळेत झाले आहे. त्यामुळे माझी या मातीशी जोडलेली नाळ कधी तुटणार नाही. असेही यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले.

राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास , ऊर्जा व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने नागरीकांच्यावतीने नागरी सत्काराचे आयोजन दिनांक ५ जानेवारी रोजी संध्याकाळी राहुरी शहरातील नवीपेठ भागात करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!