मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली. आर्यन खानला अटक झाल्याने बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली असून अनेक सेलिब्रिटी शाहरुख खानला पाठिंबा देत आहेत. यातच आता मराठमोळा अभिनेता किरण मानेने शाहरखला पाठिंबा देत एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10224199488522495
किरण माने सोशल मिडीयावर सक्रीय असून विविध मुद्द्यांबाबत ते आपले मत मांडत असतात. यावरून आता आर्यन खान प्रकरणी पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, हे बघ भावा, तुझा पोरगा दोषी असंल तर कायद्यानं त्याला काय शिक्षा होईल ती भोगावी लागंल…पर्याय नाय. पन.. त्यो जर निर्दोष आसंल तर कुनाच्या बापाचा बाप बी त्याला शिक्षा करू शकत नाय ! कायद्यापेक्षा मोठ्ठा मानूस पैदा झाला नाय या देशात अजून…
…पन नशिबाशी चाललेल्या या लढाईत तू जो संयम ठेवलायस तो पाहून तुझा लै लै लै अभिमान वाटला गड्या. तू मिडीयाफुडं यिवून घसा फाडून सोत्ताची बाजु मांडायचा धसमुसळेपना केला नाय… कुठल्या राजकिय नेत्याच्या किंवा पक्षाच्या वळचनीला जाऊन पोराच्या सुटकेची भिक मागीतली नाय.. या देशातल्या कुठल्याबी अधिकार्याचं डोळं पांढरं होत्याल एवढा पैसा चारून तू आत्तापर्यन्त पोराला बाहेर काढू शकला असतास.. पन तू ते नाय केलंस ! तू लाच दिली असतीस तर पयल्याच सुनावनीला तो बाहेर असता.. तू तारीख पे तारीख सहन करत वाट पहातोयस… कारन तुझा या देशातल्या ‘कायद्या’वर विश्वास हाय !
…आपलं पोटचं पोर असल्या आरोपात अडकनं आनि आपन काहीच न करू शकनं याचं दु:ख – याची वेदना काय असते, ती ओळखायला आपन स्वत: मोठ्या मनाचा ‘बाप’ असनं गरजेचं असतं ! कद्रू मनाची बांडगुळं मनाला यिल ती टीका करत्यात ती ऐकून तुझ्या काळजाला घरं पडत असत्याल… तू एकांतात हतबल होऊन रडतही असशील… पन तू बादशाह हायेस भावा… किंग खान हायेस… ते तू दाखवून देनार !! आमचा तुझ्यावर विश्वास आहे… जे समोर येईल त्याला तू निधड्या छातीनं सामोरा जाशील !!!
लढ भावा लढ.. तू लढवय्या हायेस.. तुझ्या पोरानं गुन्हा केला असंल तर त्याला शिक्षा होईल. त्याचं खापर तुझ्यावर फोडन्याइतके भंगार मेंदूचे आम्ही नाही आहोत. तुझा पोरगा निर्दोष ठरला तर मात्र तुझ्यावर खोटे आरोप करनार्यांची थोबाडं ठेचली जानार आहेत… त्यावेळीबी तू ‘माज’ करनार नाहीस याची खात्रीय आमाला… कारन तू खर्या अर्थानं ‘शाह’-रूख आहेस.. राजा आहेस.. हार कर जीतने वाला ‘बाजीगर’ आहेस ! लब्यू दोस्ता… सध्या किरण माने यांच्या पोस्ट सर्वांचे लक्ष वेधले असून यावर अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारकडून साखर कारखान्यांना दिलासा, प्राप्तिकरातून कारखान्यांची सुटका
- शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला; ठाकरे सरकारवर भाजपची जोरदार टीका
- मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंदरस्ते योजना; राज्यात २ लाख किलोमीटरचे शेत, पाणंदरस्ते बांधणार
- ‘एका महिलेवर खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?’ क्रांती रेडकरचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘जलयुक्त’च्या ७१ टक्के कामांमध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता; जलसंधारण विभागाचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

