🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेचं पेटले आहे.
IFSC हवं असेल तर, श्वेतपत्रिका काढा, असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला का हलवण्यात आलं, याची कारणं शोधण्याचा सल्ला देत गेल्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने केलेला पत्रव्यवहार सर्वांसमोर आणा असं आव्हान मुनगंटीवार यांनी दिलं.
राजकारण न करता जनतेसमोर ठाम भूमिका मांडा असं म्हणत आमदारकीसाठी राज्यपालांच्या भेटीची सत्र होतात, मोदींना दूरध्वनीवरुन संपर्कही केला जातो मग, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या मुद्द्यावरुन कोणताही फोन अद्यापही गेलेला का नाही, असा प्रश्न मांडत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/KirtikumrShinde/status/1256293634959380480?s=20
दरम्यान मनसेने ही शिवसेना नेते सुभाष देसाई यांना लक्ष्य केले आहे. मनसेच्या किर्तीकुमार शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, याविषयी काही प्रश्न उपस्थित करत शिवसेनेवर टीका केली. ”आदरणीय सुभाष देसाई साहेब, प्रस्तावित #IFSC मुख्यालय मुंबईहून गुजरात-गांधीनगरमध्ये नेण्याची प्रक्रिया एका रात्रीत घडलेली नाही”, असं म्हणत नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदी आले त्याचवेळी मुंबईत #IFSCचं महाराष्ट्राचं स्वप्न भंगलं, असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

