Share

#Corona : पनवेलमध्ये राहत असला तर पोलिसांनी जारी केलेल्या फतव्याची तत्काळ नोंद घ्या….

Published On: 

🕒 1 min read

पनवेल : राज्यात लॉकडाऊन असून देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच नागरिकांना आवाहन करून देखील नागरिक रस्त्यावर उतरून फिरत आहेत. यासाठी आता प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलली जात आहे. तर रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी पनवेल पोलिसांनी कठोर पाऊल उचलत सायंकाळी 5 वाजल्यानंतर संपूर्ण बाजार पेठ बंद होणार असल्याचा फतवा जारी केला आहे.

गर्दी टाळण्यासाठी पनवेल पोलिसांनी हा  फतवा जारी केला आहे. संध्याकाळी पाचनंतर सर्व दुकाने, रिलायन्स मार्ट, बिग बाजार, फळ-भाजीपाला मार्केट, फिश मार्केट बंद राहणार आहे. फक्त हॉस्पिटल, केमिस्ट आणि एपीएमसी सुरु राहणार आहे. संध्याकाळी पाचनंतर रस्त्यावर येणाऱ्या सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही कोरोबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे 14 एप्रिलला संपणारे लॉकडाऊन पुढे तसेच चालू ठेवण्याचा विचार केंद्र आणि राज्य सरकारकडून होत आहे. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतरही  केंद्र सरकारने गर्दीची ठिकाणंं जसे की, मंदिर, मॉल, शाळा-कॉलेज, इतर धार्मिक स्थळ   बंद ठेवण्याचाचं निर्णय घेतला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!