मुंबई : रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला दमदार विजय मिळाल्यामुळे आता अजिंक्यकडेच कसोटी सामन्यांचे कर्णधारपद सोपवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. हुशार नेतृत्व व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची रहाणेची वृत्ती निवड समितीतील सदस्यांनाही भावली असल्यानेच निदान कसोटी संघाचे कर्णधारपद त्याला सोपवावे असाही विचार अनेक सदस्यांनी मांडलेला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागील बऱ्याच महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कर्णधार पदावरून टीका सहन करावी लागत आहे. मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षापासून सातत्याने जिंकलेली आयपीएल स्पर्धा व कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात मिळवलेला मालिका विजय यामुळे विराटवर दबाव वाढत आहे.
विशेषतः अजिंक्य रहाणेने कसोटी मालिका जिंकल्यापासून विराट ऐवजी अजिंक्यला कसोटी कर्णधार पद देण्यात यावे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याने एक आक्रमक वक्तव्य केले असून, त्यामुळे विराट कोहलीच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मॉन्टी पानेसरने एक रोखठोक प्रतिक्रिया दिली असून , त्याच्या मते जर विराट कोहली वनडे विश्वचषक किंवा टी-20 विश्वचषक जिंकण्यात अयशस्वी ठरला तर त्याने आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा द्यावा. पानेसर म्हणाला, “हा वाद रंगतदार आहे. माझ्या मते रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्या कॉम्बिनेशनने उत्तम काम केले आहे. ज्यावेळी त्यां दोघांना संधी मिळाली त्यावेळी त्यांना त्याचा पुरेपूर फायदा उठवला आहे. त्यामुळे आता विराट कोहलीवर या दोन कर्णधारांना हाताळण्याची जबाबदारी असेल.”
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचे अनावरण करताना उद्धव ठाकरे भावूक, म्हणाले…
- अजित पवार यांना आमंत्रण दिलं होतं, पण ते का आले नाहीत माहित नाही – किशोरी पेडणेकर
- अजित पवार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी अनुपस्थित, चर्चांना उधान
- बाळासाहेबांचा पुतळा पाहताच चंद्रकांत खैरेंचा कंठ आला दाटून !
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण !


