सातारा : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून, पुढील दिशा ठरविण्यासाठी पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांनी दोघांच्या निवासस्थानी जाऊन आमंत्रण देत मराठा समाजाला दिशा देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.
विनायक मेटे यांच्या निमंत्रणाला होकार देत उदयनराजे भोसले यांनी मिटिंगला हजर राहणार असल्याचे सांगितले. बैठकीत जी चर्चा होईल त्यानुसार पुढील भूमिका ठरवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मतभेद केला नसून त्यांच्या विचाराप्रमाणे सरकारने आणि कोर्टाने निर्णय घ्यावा नाही तर उद्रेक होणार आणि याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1136210616775133/
महत्वाच्या बातम्या :
- प्रसिद्ध कीर्तनकार रामदास महाराज कैकाडी यांच्या निधनाने नगरवर शोककळा
- अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नाने नेवासा तालुक्यासाठी दोन केंद्र
- नगरमध्ये डाव्या पक्षांच्यावतीने शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाचा निषेध
- मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख म्हणजे केवळ राजकारण: खा. संभाजीराजे
- बारामतीत अजित पवारांच्या निवास्थाना बाहेर मराठा समाजाचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन


