Share

‘ही’ व्यक्ती दिल्लीत राहिली नसती तर भाजपची स्थिती झाली असती आणखी ‘बेक्कार’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: काल दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले.त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पक्ष असणारा सोबतच केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

एकूण ७० सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेमध्ये भाजपाला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. तर आपच्या झंझावातात दिल्लीतील लोकसभेच्या सातही मतदारसंघावर कब्जा असलेल्या भाजपाला यापैकी तीन मतदारसंघात खातेही उघडता आले नाही.

या सगळ्या विजयामागे एका मोठ्या व्यक्तीचा हाथ आहे. ती व्यक्ती म्हणजे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर होय.कारण सात खासदार असणाऱ्या भाजपला इतर सहा मतदारसंघात लोकांनी अजिबात हिशेबात घेतले नाही.फक्त गंभीर यांच्या मतदरसंघातील काही मतदारांनी साथ दिल्याने भाजपावरील पराभवाची मोठी नामुष्की टळली.नाहीतर अवस्था ही मागच्या निवडणुकीसारखी झाली असती.

प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणारे परवेश वर्मा, महिला नेत्या मीनाक्षी लेखी आणि भाजपाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.

पण मात्र माजी क्रिकेटपटू आणि सध्या पूर्व दिल्लीचा खासदार असलेल्या गौतम गंभीरच्या मतदारसंघाने कमळाला साथ देत भाजपाची घसरगुंडी रोखली. गंभीर प्रतिनिधित्व करत असलेल्या जागा पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपाने सर्वाधिक तीन जागा जिंकल्या. या मतदारसंघातील गांधीनगर, विश्वासनगर, लक्ष्मीनगर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले. त्यामुळेच भाजपला आपला जाागांचा आकडा किमान ८ चा आकडा गाठता आला.नाहीतर काय झाले असते हे आपल्याला वेगळे सांगायला नको.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!