मुंबई : निती आयोगाने (NITI) नुकताच भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (National Multidimensional Poverty Index -MPI) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पोषणापासून वंचित असलेल्या राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे या अहवालात म्हंटले आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkalkar) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या कुपोषित, NITI आयोगाच्या अहवालात हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. ऐकत आहात ना मुख्यमंत्री महोदय? मंत्रिमंडळातच तांदूळ चोर असतील तर जनता कुपोषित राहणारच ना? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत भातखळकरांनी टीका केली आहे.
महाराष्ट्रात ३६.०९ टक्के लोकसंख्या कुपोषित, NITI आयोगाच्या अहवालात हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.
ऐकत आहात ना मुख्यमंत्री महोदय?
मंत्रिमंडळातच तांदूळ चोर असतील तर जनता कुपोषित राहणारच ना? pic.twitter.com/FMfVJGtBRy— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 28, 2021
महाराष्ट्रासोबतच या अहवालामध्ये इतर राज्यांतील कुपोषणाबाबत माहिती दिली आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये ३३.६२ टक्के, कर्नाटकमध्ये ३३.५६ टक्के आणि तेलंगणात ३१.१० टक्के लोकसंख्या योग्य पोषणापासून वंचित असल्याचे नमुद आहे.
महत्वाच्या बातम्या
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘किरीट सोमय्या यांना महत्व देण्याची गरज नाही’
- २४ महिन्यांतील मविआचे १०० घोटाळे, किरीट सोमय्यांनी केले उघड
- ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?


