टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंडळी आता जोरदार तयारी करत आहेत. जामनगर इथल्या एका सभेत बोलताना मोदी यांनी राफेल विषयावरून विरोधी पक्षाला चांगलाच अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. यावेळी मोदी म्हणाले की, भारतीय सेनेकडे ‘राफेल असतं तर, आपलं विमान पडलं नसतं, आणि त्यांचं एकही वाचलं नसतं’
पंतप्रधान मोदी पुढील दोन दिवस गुजरात दौर्यावर आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी अनेक विकास कामांच्या भूमिपूजन करणार आहेत. अशाच एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
यावेळी मोदी पुढे म्हणाले की, भारतीय सेनेकडे आज राफेल विमान असतं तर परिणाम काही वेगळे असते. पण जर काही लोकांना समजून घ्यायचं नसेल तर त्याला मी काहीच करु शकत नाही.
दरम्यान, राफेल विमान करार हा मोदी सरकारच्या काळात चांगलाच गाजलेला वाद आहे. जवळजवळ ४ वर्ष विरोधी पक्षांनी मोदी सरकारला राफेल विमान घोटाळ्याचा आरोप करत चांगलेच पीछाडले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
