Share

भारत कोव्हीड-19 लसच्या अगदी जवळ, सीरम इन्स्टिट्यूटने (SII) केला दावा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भारत कोरोना लसच्या अगदी जवळ पोहचल्याचं दिसत आहे. कारण  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ आदर्श पूनावाला यांनी चाचण्या यशस्वी झाल्या तर कोव्हिड-19 लस पुढच्या तीन आठवड्यांत सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

जगभरातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लस शोधण्याचे काम सुरु आहे. अनेक शास्त्रज्ञ दिसव रात्र मेहनत करून लस शोधण्यास व्यस्त आहेत. मात्र आता पुण्यात स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हीड 19ची लस अंतिम टप्यात असल्याचे सांगितले आहे.

संस्थेच्या प्रेस रिलीजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत बाजारात ही लस येईल अशी अपेक्षा आहे. या चाचण्या सर्व पद्धतीने यशस्वी झाल्या तरच त्या पुढे वापरण्यात येईल असंही यामध्ये म्हटलं आहे. खरंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा समावेश जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये आहे. ही जगातील सर्वात मोठी लस आणि त्याचे डोस उत्पादक कंपनी आहे.

दरम्यान एसआयआयची लस सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत यूकेमध्ये तयार केली जाईल आणि यामध्ये क्लिनिकल चाचण्या यशस्वी होण्याची अपेक्षा आहे. दोन-तीन आठवड्यांत ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होणार नाही. एसआयआयची आशा आहे की, मेमध्ये भारतात स्वतःच्या लसीची चाचणी सुरू होईल.

पुण्यातील एसआयआयचे उत्पादन आणि उत्पादन सुविधा कोव्हिड – 19 लस तयार करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. याव्यतिरिक्त, संस्था कोव्हिड – 19 लससाठी एक नवीन सुविधा तयार करत आहे. हे पूर्ण होण्यासाठी सुमारे 2-3 वर्षे लागतील. पण सध्या असलेलल्या एका युनिटमध्ये एक लसीचे उत्पादन सुमारे 3 आठवड्यात सुरू होईल.

देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown |

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!