Share

T20 World Cup | टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनल आणि सेमीफायनल दरम्यान पाऊस पडल्यास अशा पद्धतीने ठरेल विजेता

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आयसीसी (ICC) टी 20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) आता शेवटच्या टप्प्याकडे वळली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरी (Semi final) मध्ये खेळणाऱ्या चार संघांची नावे देखील निश्चित झाली आहे. भारत (India), पाकिस्तान (Pakisthan), इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (Newzealand) या संघांनी अंतिम चार मध्ये स्नान मिळवले असून यांच्यामध्ये उपांत्य स्पर्धा पार पडणार आहे. या विश्वचषक स्पर्धेमध्ये पावसाने अनेक संघाचा खेळ खराब केला आहे. अशा परिस्थितीमध्ये उपांत्य आणि अंतिम फेरीमध्ये पावसाने व्यत्यय आणला तर विजेता कसा ठरणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टी 20 विश्वचषक सामन्यामध्ये गट सामन्यानंतर गट एक मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे. तर, गट दोन मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम चार मध्ये पोहोचले आहे. उपांत्य फेरीचे हे रंजक सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र कोणता संघ कोणत्या संघाला भिडणार आहे अद्यापही निश्चित झालेले नाही. झिंबाब्वे आणि भारत यांच्यातील सामन्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल असे दिसत आहे.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाऊस पडला तर कोण ठरेल विजेता ?

टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पाऊस पडला तर काय ? असा प्रश्न सर्वांनाच उपस्थित होत आहे. दरम्यान, याचा अर्थ असा की अतिरिक्त दिवस म्हणजे जर पावसामुळे 9 तारखेला हा सामना झाला नाही तर 11 तारखेला हा सामना पूर्ण होऊ शकतो. 11 नोव्हेंबरला ही पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही तर गटांमध्ये अव्वल स्थानी असलेला संघ पुढील जाईल.

भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये टी 20 विश्वचषक स्पर्धेचा फायनल सामना होईल अशी आशा चाहत्यांच्या मनात जागृत झाली आहे. जेव्हा दोन्ही संघ आपापले उपांत्य फेरीचे सामने जिंकतील तेव्हाच हे दोन्ही संघ फायनल मध्ये आमने-सामने मिळतील. पण जर फायनल सामना दरम्यान पावसाने धुमाकूळ घातली, तर विजेता कोण ठरणार? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत आहे. अशा परिस्थितीत आयसीसीच्या नियमानुसार अंतिम फेरीमध्ये पोहोचणाऱ्या दोन संघांपैकी जो गटांमध्ये अव्वल असेल त्याच्या नावावर विजेतेपद कोरले जाईल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!