Share

…तर मी पंतप्रधानांची दाढी ओढली असती, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची थेट मोदींवर टीका

Published On: 

औरंगाबाद : देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनानंतर त्यांनी औरंगाबादेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला, या वेळी त्यांनी ही मागणी केली आहे. देशात अनेक समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आम्ही ही मागणी करत असल्याचे ते म्हणाले.

देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात असमानतेला खतपाणी देण्याचे काम केले असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. ते म्हणाले की, ‘मध्यल्या काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळा भेट घेतली होती. मात्र, मी त्या जागी असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळा भेट नाही तर दाढी ओढली असती.’

आरक्षणाची मर्यादा काही कुटुंबापर्यंतच राहिली आहे. सर्वसामान्य गरजूंपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेलाच नसल्याचे जाधव म्हणाले. आरक्षणाचा लाभ सर्वांना मिळाला असता तर गवंडी काम करणारा ‘आयएएस’ झाला असता. आरक्षणाचा लाभ केवळ विशिष्ट लोकांनाच मिळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या सर्व प्रकरणात राजकीय मंडळी स्वत:ची ‘पोळी’ भाजत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!