Share

‘विधान परिषदेतील धनंजय मुंडेंची जागा उद्धव ठाकरेंना दिली असती तर आज ते आमदार असते’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात भाजपला राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून असा स्पष्ट सुरु निघत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजप नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपावर टीका करण्यापेक्षा आपण धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयाने रिकामी झालेली जागा मुख्यमंत्र्याना का दिली नाही? ते केल असत तर आज मुख्यमंत्री आमदार असते, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. येत्या २८ मे पर्यंत त्यांना याची पूर्तता करावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यपाल कोट्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागेवर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात यावी, असे प्रयत्न महाविकासआघाडीकडून केले जात आहेत.

मात्र विरोधी पक्ष भाजप कुठेतरी यामध्ये आडकाठी करत असल्याचा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निघत आहे. आता जयंत पाटील यांनी ही राज्यात भाजपला राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे, असा गंभीर आरोप  केला आहे.

भाजपकडून राज्यात राष्ट्रपती लगावट लागू करण्याचे प्रयत्न : जयंत पाटलांचा गंभीर आरोप

नेमक जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असून त्यातूनच त्यांचे खटाटोप सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यात महाराष्ट्रामध्ये माध्यमांची गळचेपी सुरू आहे. अघोषित आणीबाणीसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती. या पत्रातून राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असाच सूर निघत असल्याचं दिसत  आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!