मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांनी यासाठी आपआपल्या तयारी सुरु केल्या आहेत. तर भाजपने स्वबळावर उत्तर प्रदेशातील निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी RPI अगोदर पासूनच एनडीए सोबत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी भाजपने काही जागा सोडाव्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान यावरूनच राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी आठवलेंवर निशाना साधला आहे.
श्री @RamdasAthawale जी, बताइए एक बात,
अगर उत्तर प्रदेश के चुनाव में एनडीए ने नही रखा आपको साथ,
तो क्या केंद्र में आप छोड़ देंगे उनका हाथ ?#रामदासआठवले #RamdasAthawale pic.twitter.com/vKxct9x6GW— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो ???????? (@Clyde_Crasto) September 16, 2021
RPI चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी निवडणूक संदर्भात भाजपचे जे.पी. नद्दा यांचाशी चर्चा केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, जर भाजपने उत्तर प्रदेशात RPI ची साथ सोडली तर केंद्रातही RPI भाजपची साथ सोडणार का? असा सवाल करत याचे उत्तर रामदास आठवले यांनी द्यावे अशी मागणी क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत केली आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील निवडणुकींसाठी भाजप, काँग्रेस तसेच समाजवादी पक्षाने जोरात तयारी सुरु केली आहे. आतापासूनच यासाठी नेत्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- GST कौन्सिलची आज महत्वाची बैठक; पेट्रोल-डिझेल तब्बल 25 रुपयांनी स्वस्त होणार?
- विराट कोहली कर्णधारपद सोडणार; थोड्याचवेळा पूर्वी केली मोठी घोषणा
- मोदींचा वाढदिवस युथ कॉंग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करणार
- ज्यांनी आतापर्यंत लस घेतली नाही त्यांनी लस घेऊन मोदींना वाढदिवसाची भेट द्यावी; केंद्रीय मंत्र्याचे आवाहन
- साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंची अध्यक्षपदी निवड


