Share

पुन्हा सत्ता आल्यास भाजप देणार गरीबांना दोन रुपयात किलोभर गव्हाचे पीठ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर पक्षाचा संकल्प पत्र सादर केला आहे. संकल्पपत्र सादर करताना पक्षाचे दिल्लीचे सर्व सात खासदार आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.

भाजपनेही गरीबांना दोन रुपये किलो गव्हाचे पीठ देण्याची घोषणा केली आहे. या शिवाय दिल्लीकरांना स्वच्छ पाणी देण्याचं आश्वासन ही भाजपनं दिलं आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात दिल्लीकरांसाठी या घोषणा करण्यात आल्या आहेत.यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या हस्ते भाजपच्या या ‘दिल्ली संकल्प पत्रा’चं जाहीर केलं आहे.

यावेळी मनोज तिवारी यांनी आरोप केला आहे की, दिल्ली सरकारने केंद्राच्या योजना लागू केल्या नाहीत. तिवारींनी आप सरकारवर हल्लाबोल केला आहे. आप सरकारने सर्वसामान्यांना दिलेले वचन पूर्ण केले नसल्याचा आरोप लावला आहे.

https://twitter.com/BJP4India/status/1223223397317890048?s=20

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे पक्षांकडून संकल्पपत्र सादर केले जात आहे. आता सरकार सत्तेत आले तर पुढील पाच वर्षे काय काय काम करणार याचं नियोजन सादर केलं जात आहे.दिल्लीतील रुग्णालये, सरकारी रुग्णालये आणि अन्य सर्व सरकारी अस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना वयाच्या ५८व्या वर्षापर्यंतची जॉब हमी देण्यात येणार असून येत्या ५ वर्षात दिल्लीत कमीत कमी १० लाख रोजगार निर्माण करण्यात येणार असल्याचंही या संकल्प पत्रात म्हटलं आहे.

 

 

हेही बघा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!