टीम महाराष्ट्र देशा : खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्जच मिळाले नाही. यावर्षी विविध बँकांनी आतापर्यंत २८ टक्के कर्जपुरवठा केलेला आहे. काही बँकांची कर्ज देण्याची टक्केवारी १० टक्क्यांच्या आत आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जाचा आढावा घेतला. बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा करण्याचे निर्देश बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक व्यवस्थापक डी. के. सिंह, नाबार्डच्या जिल्हा विकास प्रबंधक मैथिली कोवे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अजय कडू आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते जिल्ह्याचा पत आराखडा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

