Share

आपल्या देशात कोरोना व्हायरसचा रुग्ण आला तर त्याला गोळी मारा ; हुकुमशहा किम जोंगचे फर्मान

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.आपल्या देशात कोरोना व्हायरसचा रुग्ण आला तर थेट गोळी मारा, असे आदेश त्याने दिले आहेत. किम जोंग नेहमी आपल्या हटके निर्णयांसाठी परिचीत आहे. यंदा पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे तो चर्चेत आला आहे.चीनवरुन कोरियात परतलेल्या एका व्यापाऱ्याला कोरोना व्हायरस झाला आहे. त्या रुग्णाला गोळी मारण्याचे आदेश जोंगने दिले आहेत. पीडित व्यक्तीमुळे इतर कोणाला या रोगाची लागण होऊ नये म्हणून त्यांनी हा आदेश जारी केला आहे.

किम जोंग उनचा हा काही पहिलाच वादग्रस्त निर्णय असं नाही. यापूर्वी त्याने स्वत:च्या संरक्षण मंत्र्याला तोफेच्या तोंडी दिलं होतं. शिवाय जनरलाला घातक माशांच्या तलावात फेकलं होतं.जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात ८६ हजार लोकांना या रोगाची लागण झाली आहे.

सर्वाधिक कोरोना व्हायरस रुग्ण हे चीनच्या हुबेई राज्यात आहेत. ज्याची राजधानी वुहानमधून गेल्या डिससेंबर महिन्यापासून हा व्हायरस पसरला आहे. भारतात सुद्धा कोरोना या आजाराचा रुग्ण सापडला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!