Share

निकालांवरून मी विरोधकांवर टीका करणार नाही, मात्र त्यांनी… भुजबळांचा भाजपला टोला

Published On: 

नाशिक : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हे जाहीर झाले असून शिवसेना व भाजप यांच्यात अव्वल स्थानासाठी काटे की टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. तर, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे.

या निकालांवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं आहे. ‘ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आनंद देणारे आहेत. राज्य पातळीवर झालेली तिन्ही पक्षांची आघाडी तळागाळातील जनतेनं स्वीकारली आहे असा याचा अर्थ आहे. या निकालावरून मी विरोधकांवर टीका करणार नाही. त्यांनी निकालाचा अभ्यास करावा. मनचिंतन, मतचिंतन काय हवे ते करावे’ असा टोला भुजबळांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!