Share

बापरे …लॉकडाउनच्या काळात लॅपटॉप, स्मार्टफोनच्या खरेदीत ३० टक्के वाढ

Published On: 

पुणे : कोरोना विरुद्धची लढाई गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आला. सर्वच क्षेत्र बंद पडत आसतना खासगी कंपन्यांकडून घरातून काम (वर्क फ्रॉम होम) असा मार्ग काढण्यात आला. तर आता मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरातूनच काम आणि शाळा-महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर गरज म्हणून स्मार्टफोन, लॅपटॉप खरेदीकडे कल वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांचे निरीक्षनातुन असे समोर आले आहे कि, ‘लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या विक्रीत सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. असे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.

पुणे इलेक्ट्रॉनिक हायर परचेस असोसिएशनचे सचिव राजेश अगरवाल म्हणाले की, ‘साधारणपणे एक जूनपासून स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या खरेदीत वाढ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ऑनलाइन शिक्षण आणि घरातून करावे लागणारे काम ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. संगणकाच्या तुलनेत लॅपटॉपसाठीची जास्त मागणी आहे. तर लॅपटॉपमध्ये २० ते ३० हजारच्या लॅपटॉपना जास्त मागणी आहे. आणि स्मार्टफोनच्या वाढलेल्या विक्रीमध्ये साधारणपणे ८ हजार ते १७ हजारांपर्यंतच्या स्मार्टफोनला जास्त मागणी आहे. त्यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवता येणाऱ्या स्मार्टफोनची मागणी सर्वाधिक आहे.

जास्त क्षमतेच्या चित्रफिती डाउनलोड करण्यासाठी पुरेशी मेमरी फोनमध्ये असावी हा विचार त्यानमागे आहे. कमी क्षमतेचा स्मार्टफोन घेतल्यास त्यावर ताण येऊन तो सतत बंद पडण्यासारखे प्रकार घडतात. त्यामुळे चांगल्या दर्जाचा फोन घेण्याकडे विद्यार्थी-पालकांचा कल आहे, असे निरीक्षण असोसिएशनचे माजी सचिव आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यावसायिक विनोद अगरवाल यांनी नोंदवले.

आपण जे बोलतो ते करतो का, याचा विचार करा; ठाकरेंना फडणवीसांचा टोला

परस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकसोबत मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घ्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे भारतासाठी अशक्यच, चीनचा थेट इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!