Share

पुण्यातील दुकानदार, व्यापारी पवारांच्या भेटीला, आपल्या अडचणींचा वाचला पाढा

Published On: 

पुणे : पूना मर्चंट्स चेंबर्सच्या शिष्टमंडळासह वालचंद संचेती तसेच पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळासह फतेचंद रांका यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील व्यापारी व दुकानदारांच्या अडचणींसंदर्भातील निवेदन दिले.

मोदींची मोठी घोषणा; स्थलांतरीत मजूरांच्या रोजगारनिर्मितीसाठी देणार ५० हजार कोटी

पुणे व्यापारी महासंघात ८२ संघटना अंतर्भूत असून पुणे शहरातील २५ हजारांहून अधिक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा यात समावश आहे. महासंघाच्या प्रतिनिधींनी व्यापाऱ्यांच्या विविध अडचणींची माहिती देऊन याबाबत लक्ष घालण्याची विनंती शरद पवारांना केली आहे. तर घाऊक बाजारपेठेसाठी पुणे शहरात शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्री प्रदशर्नांचे पुण्यात आयोजन करण्यासाठीही सरकारने स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे, अशा विविध मागण्या देखील त्यांनी मांडल्या आहेत.

भुजबळांचा धडाका; आणखी तीन महिने मिळणार मोफत अन्नधान्य

दरम्यान, १०० हून अधिक कर्मचारी काम करत असलेल्या संघटनांनाही केंद्र सरकारने पीएफची सुविधा द्यावी, छोट्या व्यापऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, व्यापऱ्यांना निवृत्तीनंतर लाभदायी ठरेल अशी आयुषमान भारतसारखी योजना केंद्राने सुरू करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील समस्या अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी तसेच काही नवीन योजना बनवताना सरकारी समितीत पुणे व्यापारी महासंघाच्या किमान एका सदस्याचा समावेश असावा अशीही विनंती शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. पुणे व्यापारी महासंघाच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेऊन, सरकारपर्यंत या समस्या पोहचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन, असे शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!