🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे आज निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.
नीला सत्यनारायण 1972 च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण परिचित होत्या. नीला सत्यनारायण यांनी 37 वर्षांच्या कारकिर्दीत गृह, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केलं.
श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी त्या मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांच्या निधनाने आपण एका कुशल प्रशासकाला, संवेदनशील साहित्यिकाला मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ राज्याची सेवा केली. राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडत असताना साहित्यक्षेत्रातही त्यांनी स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनानं एक कुशल प्रशासक, उत्तम साहित्यिक, संवेदनशील व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्याचं बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या भीतीने अनेक दवाखाने बंद, पालकमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा
नवे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते?
मोठी बातमी : आयआयटीच्या कोविड किट्सला आयसीएमआरची मान्यता
अखेर ‘तो’ निर्णय रद्द झाल्यावर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

