Share

कोरोनाच्या भीतीने अनेक दवाखाने बंद, पालकमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा

Published On: 

बुलडाणा : प्राण संकटात सापडलेल्या माणसासाठी डॉक्टर हे देवाचेच रुप असते. लहान सहान दुखण्यापासून तर जोखमीच्या शस्त्रक्रियेपर्यंत रूग्ण आणि त्याचे नातेवाईक डॉक्टरांवरच भिस्त ठेऊन असतात. मात्र, जिल्ह्यातील या पैकी काही डॉक्टरांनी कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू असतांना चक्क दवाखाने बंद केले आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणवल्या जाणाऱ्या रूग्णालयातील डॉक्टरांचे हे अवसानघातकी लॉकडाऊन रुग्णांच्या जीवावर उठले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अश्या असामाजिक डॉक्टरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी कारवाई करावी

अद्याप बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण निष्पन्न झाला नसला तरी संशयीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असतांना जिल्हा आणि तालुका स्तरावरील सरकारी व खाजगी रुग्णालयात निरंतर सेवा अत्यावश्यक आहे. तरी देखील जिल्ह्यातील काही डॉक्टर्स बेजबाबदारपणे दवाखाने बंद ठेवत आहेत. स्वतः डॉक्टर असलेले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अश्या डॉक्टरांवर त्वरित कारवाई करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हावासी करत आहेत.

वैश्विक महामारी म्हणून घोषित झालेला कोरोना विषाणू भारतात हातपाय पसरत आहे. त्यातही महाराष्ट्रात हा आजार झपाटय़ाने वाढत चालला असून मुंबई, पुणे व नागपूर या महानगरांसह अनेक जिल्हे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. या भयावह परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने सरकारी आणि खासगी रुग्णालयांना आपल्या ओपीडी चोवीस तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, बुलडाणा जिल्ह्यातील काही डॉक्टरांनी शासनाच्या या आदेशाला हरताळ फासल्याचे दिसत आहे. एरवी २४ तास खुले असणारे या डॉक्टरांचे दवाखाने काही कारण नसतांना गेल्या तीन – चार दिवसांपासून बंद झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जोखीम स्वीकारण्याची तयारी नसलेल्या या डॉक्टरांचे स्वार्थी वर्तन मात्र रुग्णांच्या जीवावर उठत आहे.

… मग आताच दवाखाने का बंद ?

सुमारे १२ – १५ वर्षांपूर्वी सर्वत्र चिकुन गुणिया या साथरोगाने थैमान घातले होते. तेंव्हा प्रत्येक दवाखान्यात रुग्णांची अलोट गर्दी होत असे. या संधीचे सोने करत कित्येक डॉक्टरांनी रग्गड कमाई केली होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या साथीदरम्यान किरकोळ सर्दी खोकला झालेल्या रुग्णांसाठी देखील दवाखान्याचे दरवाजे बंद झाले आहेत. चिकुन गणिताच्या साथीमध्ये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फिस आकारणार्या याच डॉक्टरांनी कोरोनावर ठोस औषध नसल्याचा बहाणा पुढे करुन रुग्णांची तपासणी देखील नाकारतांना दिसतात. या मागे कोरोनाचा संसर्ग स्वतः ला होऊ नये हेच कारण असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!