मुंबई : महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे बोगस सोयाबीनचे बियाणे विकून हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. सर्वसामान्य शेतकर्यांनी घरगुती बियाणे वापरून सोयाबीनची पेरणी केली ते ज्ञान उगवलं. परंतु महाराष्ट्र सरकारने इंदोर आणि कर्नूल या ठिकाणावरून खरेदी केलेलं महामंडळाचे मात्र 70 टक्के जर्मिनेशन असताना देखील उगवलं नाही.
येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्यांना चांगला धडा शिकवू – लोणीकर
यावरून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला जाब विचारला असून बियाणं महामंडळाला महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे रक्त शोषण करणारी संस्था करून ठेवला आहे. बियाणे महामंडळ म्हणजे शेतकऱ्यांची दलाली करणारे केंद्र बनले आहे अशा शब्दात बबनराव लोणीकर यांनी शासन आणि प्रशासनाला जाब विचारला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून बोगस बियाणे विक्री करणारांविरोधात कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकरी अपार कष्ट करुन बियाणं पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी – बियाणं बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी आहे. मेहनत करून पीक आलं नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.
‘सत्ताधाऱ्यांनी बियाणे महामंडळ शेतकऱ्यांचं रक्त शोषण करणारी संस्था करून ठेवली’
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातून बोगस बियाणांच्या तक्रारी काही प्रमाणात प्राप्त होत आहेत, त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना जे फसवतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतील व त्यांच्याकडून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसुल केली जाईल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
