Share

‘डॉ. दाभोळकरांवर मीच गोळ्या झाडल्या’ : कळसकरची कबुली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित शरद कळसकरला पुण्यातील न्यायालयाने १ वर्षापूर्वी सीबीआय कोठडी सुनावली होती. ‘डॉ. दाभोळकरांवर मीच गोळ्या झाडल्या’, अशी कबुली जबाब शरद कळसकर याने सादर केलेल्या अहवालात दिली आहे.

अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी (फोरेन्सिक सायकॉलॉजिकल अ‍ॅनेलेलिस टेस्ट) करण्यात आली होती. त्यावेळी शरद कळसकरने  सदर कबुली जबाब दिला. या टेस्टमध्ये त्याने दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. जून २०१८ मध्ये कळसकरने संजीव पुनाळकरांची भेट घेतली होती. कळसकरने पुनाळकरला हत्येची सामग्री नष्ट करण्यास सांगितल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

अहवालात त्यांच्यावर गोळ्या कशा पद्धतीने झाडण्यात आल्या, आणि त्याचे साथीदार पुण्यात कसे आले, दाभोळकरांची हत्या करण्याचे कारण काय होते, त्यांच्याकडे शस्त्र कशी आली, त्यांनी कट कसा रचला आदींबाबतची सविस्तर माहिती अहवालात देण्यात आली आहे. पुणे स्टेशनला विक्रम भावे आणि कळसकर भेटले, त्यांनी रस्त्यात टोपी आणि कपडे बदलले. बंदूक घेऊन दाभोळकरांच्या वेळेचे नियोजन लक्षात घेऊन त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली, अशी संपूर्ण माहिती त्याने दिलेल्या अहवालात सांगण्यात आली.

दिलेल्या अहवालानुसार, कळसकरने वकील संजीव पुनाळेकर यांचेही नाव या अहवालात कळसकरने घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात वकील संजीव पुनाळेकर सुद्धा अटकेत आहेत.

दरम्यान, रविवारी पुणे न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या संबंधीचा अहवाल मंगळवारी विशेष न्यायालयात सीबीआयकडून सादर करण्यात आला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर ३ रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर पहाटेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!