Share

‘महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल कुठलीही कल्पना नाही’, चाकणकरांचे स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. दीड वर्षांपासून हे पद रिक्त आहे. महिला अत्याचाराच्या घटना राज्यामध्ये वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल कुठलीही कल्पना नाही असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी दिले आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची कुठलीच कल्पना नाही. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याबद्दल वक्तव्य करणे चुकीचे आहे. संघटनेची महिला अध्यक्ष म्हणून उत्तम रित्या काम चालू आहे. मनाला समधान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच चित्रा वाघ यांच्या या ट्विटवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल मला काही बोलायचं नाही’ असे त्या म्हणाल्या.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. शिवसेना-भाजप युती सरकार काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांची महिला अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. त्याच प्रमाणे अन्य महामंडळावरील नियुक्त्याही सरकारकडून लवकरच केल्या जाणार असल्याचे समजते. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी राज्यभरात राष्ट्रवादीचे महिला संघटन मंजबूत करण्यासाठी मेहनत घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!