Share

‘मी ‘सामना’ वाचतच नाही, म्हणून त्यावर प्रतिक्रियाही देत नाही!’, नाना पटोलेंनी शिवसेनेला डिवचले

Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे. पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात करण्यात आला आहे.

‘काँग्रेसला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचे आजच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
यावर माध्यमांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी ‘सामना’वर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही कारण मी ‘सामना’ वाचत नाही असे उत्तर दिले. तसेच कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हाला एकदा करावा लागेल असेही ते म्हणाले.

नाना पटोले हे आज सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार आहेत. काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांचीही बैठकीला हजेरी राहणार आहे. नवी दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत असून, या बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!