पुणे : येत्या २६ मार्च रोजी महाराष्ट्रातून राज्यसभेच्या ७ जागांसाठी मतदान होणार आहे.त्यात पक्षीय बलाबलानुसार विचार केला , तर भाजपच्या ३,कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना अर्थात महाविकास आघाडीच्या ४ जागा निवडून येऊ शकतात.
भाजपने आज तीनही लोकांची नावे जाहीर केली. त्यात उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि डॉ.भागवत कराड यांचा समावेश आहे. उदयन राजे आणि रामदास आठवले यांचे नावं आधीच फायनल झाले होते.तिसऱ्या नावाबद्दल उत्सुकता होती.कारण भाजपचे सहयोगी सदस्य असणारे संजय काकडे हे त्या जागेसाठी आग्रही होते.पण आज अचानक डॉ. कराडांचे नाव आल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला.याविषयावर खासदार काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज माहिती दिली.
काकडे म्हणाले की , मला उमेदवारी मिळाली नाही तरी काही हरकत नाही,पण जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती.पण शेवटी पक्षाचा निर्णय मला मान्य आहे.मी कधीच दिल्लीत रमलो नाही.मी महाराष्ट्रात काम करण्यासाठी प्रचंड इच्छुक आहे त्यामुळे येत्या काळात मला मोठी जबाबदारी मिळेलच.
सोबतच येत्या २ तारखेला माझी खासदारकीची टर्म संपणार आहे. त्यानंतर मी भाजपचा अधिकृत सदस्य होईल. त्याचबरोबर माझा केंद्रातील नेतृत्वातील आणि राज्यातील नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मी कुठल्याच दुसऱ्या पक्षात जाण्याचा विषय येतचं नाही, असेही संजय काकडे म्हणाले.तर जावई रोहन देशमुख जर पदवीधर मतदार संघासाठी इच्छुक असतील तर आपला त्याला पूर्ण पाठींबा राहील असेही काकडेंनी स्पष्ट केले.
हेही पहा:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

