नांदेड : राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. यातच आता भाजपाचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ईडीची पुढची कारवाई आता नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेत दिले आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ईडी किंवा आयकर विभागाची आता पुढची कारवाई नांदेडच्या नेत्यावर होणार का? असा प्रश्न भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी ‘मी काही त्या तपास यंत्रणाचा अधिकारी नाही. पण माझ्या हसण्यावरून तुम्ही समजून घ्या’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे अप्रत्यक्षपणे संकेत दिले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत पाटलांना टोला लगावला आहे. त्यांना एवढी माहिती कुठून मिळते हे मला माहिती नाही. मला यावर अधिक भाष्य करायचं नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत राहण्यासाठी ते अशी विधान करत असतात. निवडणुकीच्या काळात त्यांना संभ्रम निर्माण करायचा आहे’, असा टोला चव्हाण यांनी पाटलांना लगावला. सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांबाबत अनेक ठिकाणी अश्या गोष्टी सुरू आहेत. परंतु जे काही लोकशाहीमध्ये जे काही सुरू आहे, ते अपेक्षित नाहीये. ठीक आहे, त्यांना काय करायचं ते करू द्या, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिका-यांना जबाबदा-यांचे वाटप; अतुल लोंढे यांच्याकडे महत्वाची जबाबदारी
- …म्हणून ही जागा ठेवणं योग्य नाही; बाबुल सुप्रियोंचा खासदारकीचा राजीनामा
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला

