कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक लढवून दाखवावी तसेच या निवडणुकीत उतरुन त्यांनी आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही. असे आव्हान दिले होते. आता यावरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत यावर वक्तव्य केले. शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील बोलतात हे आक्षेपार्ह आहे. पाटील यांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. अन् पवारांना माढामधून मागे घालवल्याचे बोलतात. येत्या काळात असं बोलणं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देत त्यांनी स्वत:चं गाव राखता आलं नाही आणि संजय राऊत यांना कशाला आव्हान देता? असा सवाल मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना केला आहे.
दरम्यान यावरच संजय राऊत यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे तिकडे मी असणारच. आणि ती जबाबदारी मी नेटाने पार पाडणार, मात्र तुम्ही तुमचं बघा असा सल्लादेखील संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिला. तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले. आम्ही तुम्हाला काही बोललो का? तुम्हाला आमचा त्रास होत असेल पण आमचं सोडून स्वतःकडे बघावे असे म्हणत त्यांनी पाटलांना खेचक टोला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- शेवटच्या इंग्लंड दौऱ्यातून शिकलो, एंडरसन आणि ब्रॉडचा कसा सामना करायचा : केएल राहुल
- धडाकेबाज अर्धशतक करणारा जडेजा पोहोचला ‘या’ दिग्गजांच्या यादीत पाचव्या स्थानी
- तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड ७० धावांची पीछाडीवर, टीम इंडिया पहिला डाव सर्वबाद २७८
- पुनावाला यांची मोठी घोषणा ; कोवोवॅक्स भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार लाँच, तर लहान मुलांची…
- नाशिकरांनो सावधान ! एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण

