🕒 1 min read
महाराष्ट्र देशा टीम : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या लॉकडाउनला झुगारून मंगळवारी वांद्रे पश्चिम येथे हजारोंचा जमाव गोळा झाला. या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले.
लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडण्याला सक्त मनाई असताना वांद्र्यात इतकी लोकं जमलीच कशी, असा प्रश्न दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. विवेकने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करत ट्विट केलं आहे.
‘माझा एक साधासोपा प्रश्न आहे. पोलीस बॅरिकेड्स, कॅमेरे असतानाही शहरात हजारोंच्या संख्येनं लोक कसे जमा होतात? मी माझ्या घराजवळच्या किराणा दुकानात पत्नीसोबत जाऊ शकत नाही. कारण पोलीस दोन जणांना एकत्र कुठे जाऊ देत नाहीयेत. मग इतकी लोकं कशी जमली? या अपयशाचं कारण काय’, असा सवाल विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे.
https://twitter.com/vivekagnihotri/status/1250269904567033857?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
