सांगली : पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सद्याचे सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील हे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलं आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’ कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.
संजयकाका पाटील हे भाजपमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले असता, जयंत पाटील यांनी आग्रहाने संजयकाकांना शेजारी बसवून घेतलं. यानंतर उपस्थितांमध्ये तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती. कारण, भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौऱ्यात खासदार संजयकाका गैरहजर राहिल्याचे दिसून आलं होतं. दरम्यान, या दोन नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा देखील झाल्याचं सांगण्यात येतंय.
यावर संजयकाका पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याचा विषय नाही, गट तट पक्ष हा मुद्दा थोडा बाजूला ठेवून जिल्ह्यातील चांगल्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो. मी भाजपशी प्रामाणिक आहे. मात्र कोणी जर मी भाजपमधून बाहेर जावं, असं म्हणत असतील, तर मी त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही,’ असं भाष्य संजकाकानी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मनपाकडून ४३० किलो प्लास्टिक जप्त, पण ते शहरात आलेच कसे?
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ‘वो नही करेंगे तो हम करके दिखायेंगे’, सरदार वल्लभभाईंच्या पुतळ्यावरून काँग्रेसचा शिवसेनेला इशारा
- …तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू


