🕒 1 min read
पुणे : कोविड काळातील राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या सामाजिक, विधायक कार्यासंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टच्य विश्वस्त मंडळातील सदस्यांनी ट्रस्ट तर्फे करण्यात आलेल्या विविध सामाजिक तसेच विधायक कार्यासंबंधी माहिती दिली. तसेच उपस्थित विविध वैद्यकीय संघटना व कलावंत प्रतिनिधींनी ट्रस्टने केलेल्या मदतीबद्दल आभार मानतानाच आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाही प्रमुख, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हजेरीने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.
…तर उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीची महापूजा करू नये, पडळकरांचा घणाघात
यावर आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा आहे आणि अनेक वेळेला गांधींजींच्या हत्येचे समर्थन शरद पोंक्षे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महात्मा गांधीजींचे विचार थोर होते आणि आहेत म्हणूनच गांधीजींना विरोध करणार्यांना सुद्धा गांधीजींचा फोटो असलेल्या नोटांचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो.
पुढे त्या म्हणाल्या, शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर आले यात आनंदच आहे, कारण गांधीजींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्यांना सुद्धा आता गांधीजींचे विचार असलेल्या पक्षाच्या व्यासपीठावर यावसं वाटतंय यातच गांधीजींच्या विचारांचा विजय आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी याप्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका फेसबुक पोस्ट मधून स्पष्ट केली आहे. सनातनी शरद पोंक्षेचा NCP सोबत कसलाही संबंध नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा सरचिटणीस या नात्याने तो व त्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी लक्ष्मण माने इतर पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे नाट्य परिषदेला व इतर घटकांना कोरोना संकट काळी मदत केली. त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी पोंक्षे परिषदेचा सरचिटणीस नात्याने व्यासपीठावर उपस्थित होता अशी सारवासारव त्यांनी केली आहे.
मोठी बातमी : फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर
लवांडे पुढे म्हणाले,त्या नाट्य परिषदेच्या कार्यकारी मंडळात सर्व विचारधारेचे सदस्य आहेत. त्यांच्या व्यक्तिगत विचारांचा कसलाही पक्षाशी संबंध नाही. पोंक्षे बरोबर पक्षाचे व्यक्तिगत मतभेद कायम आहेत. पक्षाशी त्याचा कुणीही संबंध जोडू नये. नथुराम गोडसे समर्थकांना विरोध कायम राहील. त्या कार्यक्रमाचा सोशल मिडियाद्वारे अपप्रचार गैरसमज करू नये असं म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
