Share

मावशीच्या गावात साकारणार मुंडे साहेबांचा पुतळा

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचे नाते जुने आहे. त्यामुळेच तालुक्यातील प्रत्येक गावातील एक वीट व लोकवर्गणीतून नगरपालिकेच्या जॉगिंग पार्कमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहात तालुक्यातील गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. मुंडे यांचा पुतळा उभारण्यासाठी समिती स्थापन करण्याचा व समितीच्या अध्यक्षपदी आमदार मोनिका राजळे यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे पाथर्डीत नगरपालिकेने उभारलेल्या जॉगिंग पार्कमध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा बारा फुटाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. त्यासाठी सामान्य माणसाच्या कष्टाचा एक रुपया आमच्यासाठी लाख मोलाचा असेल. लोकांच्या वर्गणीतून हा पुतळा उभारला जाईल. तालुक्यातील प्रत्येक गावातून एक वीट पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

शिल्पकार प्रमोद कांबळे हे स्व.मुंडे साहेबांचा पुतळा तयार करीत आहे. ह्या पुतळ्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या बैठकीला नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, सोमनाथ खेडकर यांच्यासह अनेक मुंडेप्रेमी उपस्थित होते.

अभाविपची उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी, धुळ्यात अडवला अब्दुल सत्तारांचा ताफा

“दार उघड उद्धवा, दार उघड”, भाजपा अध्यात्मिक सेलचे २९ ऑगस्टला आंदोलन

धुळे पोलिसांच्या गुंडागर्दीचा निषेध करावा तितका कमीच ; भाजपा आमदार राम सातपुतेंनी केली कारवाईची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!