Share

पत्नीच्या जाचाला कंटाळले पती, पुण्यात दाखल झाल्यात हजारो तक्रारी !

Published On: 

पुणे : कोरोनाच्या महामारीत अनेक जण घरातून काम करत आहेत. त्यामुळे घरांमध्ये किरकोळ कारणावरून झालेले वाद विकोपाला जात असून कौटुंबिक कलहाची झळ आता पुरुषांनाही बसत आहे. पुणे पोलिसांच्या ‘भरोसा कक्षा’कडे दाखल झालेल्या तक्रार अर्जातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

पत्नीकडून पतीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळाचे प्रकार वाढत असून केवळ पुण्यात गेल्या दीड वर्षात १ हजार ५३५ पुरुषांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत. पुणे पोलिसांच्या ‘भरोसा कक्षा’कडे दाखल झालेल्या तक्रार अर्जातून ही बाब समोर आली. कोरोनाकाळापासून कौटुंबिक कलहातून एकूण तीन हजार तक्रारी दाखल झाल्या. त्यात महिलांच्या आपल्या पतीविरोधातील तक्रारींची संख्या एक हजार ५४० इतकी आहे. म्हणजेच पुरुषांनाही महिलांइतकेच छळाला सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले.

या तक्रार अर्जांपैकी दोन हजार ३९४ अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच दाम्पत्यातील वाद सामोपचाराने मिटवण्यात आले आहेत. करोनाच्या संसर्गात दाम्पत्यांमधील वाद वाढीस लागले आहेत. पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडून समुपदेशन करण्यात येते. तसेच एखाद्या प्रकरणात पोलीस ठाण्यांचीही मदत घेण्यात येत आहे.

गेल्या वर्षी पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाकडे एक हजार २८३ पुरुषांनी कौटुंबिक कलहाच्या तक्रारी दिल्या होत्या. महिलांकडून ७९१ तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी मे अखेरीपर्यंत २५२ पुरुषांनी तसेच ७४९ महिलांनी तक्रार अर्ज दाखल केले आहेत.

भरोसा कक्षाकडे येणाऱ्या पुरुषांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पत्नी नांदायला येत नाही किंवा किरकोळ वादातून पत्नी त्रास देत असल्याच्या तक्रार अर्जांचे प्रमाण जास्त आहे. बऱ्याचदा दाम्पत्यातील वाद कुटुंबात सोडविले जात नाहीत. पोलिसांकडे एखादा वाद आल्यास दाम्पत्यामधील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे भरोसा कक्षच्या सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!