तुळजापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये म्हणुन तालुक्यातल्या अनेक गावातील शेकडो कुटुंबांनी जवळपास महीना भरापासुन गाव सोडून शेतातच आश्रय घेतला आहे.
शेतशिवारात वास्तव्य करुन कोरोनाशी मुकाबला करताना शिस्त व नियमाचे पालन करताना कुटूंब दिसत आहेत. सोलापुर शहरात कोरोनाने एक बळी घेतल्यानंतर जिल्हा सिमेलगत गावात दहशत निर्माण झाली आहे त्यापुर्वी उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचे रूग्न आढळून आल्याने अनेक भागातील नागरीकानी विशेष काळजी घेण्याचे ठरवले प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक गावातील . कुंटूबानी गावे सोडुन शेतात मुक्काम थाटला आहे .
कुटुंबातील एक जन गरजेप्रमाणे किराणा सामान आणतो. त्यानुसार दैनंदिन परिक्रमा चालु आहे. गर्दीपासून दूर राहून स्वताचे संरक्षण करीत कोरोनाशी कोरोना ग्राम सहाय्यता कक्षाकडून मिळणाऱ्या सुचनाचे पालन हे कुटुंब करीत आहेत त्यात मास्क वापरने, हात धुणे , सोशल डिस्टन्सींगचा वापर केला जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

