पारनेर : जगभरात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. राज्यात देखील कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारच्या या देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सर्वञ कोरोना व्हायरस रोगाने भिंतीचे वातावरण निर्माण केले आहे . यामुळे गावा गावातील बाजरपेठावर मोठ्या प्रमाणात परिमाण दिसून येत आहे. पारनेर तालुक्यात जनता कर्फ्यू ला 100% प्रतिसाद मिळाला कोणीही घराबाहेर फिरकत नाही. तसेच कोरोना व्हायरस रोगाच्या धास्तीने सर्व क्षेत्रावर मोठे परिणाम जाणवायला सुरू झाली आहे .
ऐन लग्न घाईत या रोगामुळे मंगल कार्यालय निवेदक,वांजञी, डॅकोरेशन, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील आर्थिक व्यवहाराला चांगलाच फटका बसतो आहे. सेवा संस्थेचे कर्जदार सभासद हे नहेमी आपल्या कर्जाचा भरणा करण्यात करिता सेवा संस्थेमध्ये येतो असतो. पारनेर येथील जिल्हा बॅकेत देखील खातेदाराने कोरनो व्हायरस धास्तीने पाठ फिरवल्याचे पाहिल्या मिळाले.
या भागात जीवनावश्यक असणारे किराणा दुकान, बॅका, पतसंस्था, हाॅस्पिटल चालु असल्यातरी रोजच्या वर्दळीपेक्षा कमीच पाहायला मिळत आहे.पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, निघोज, अळकुटी, टाकळी ढोकेश्वर, भाळवणी आदि महत्वाची मोठी बाजारपेठा आहे.


