Share

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात चांगला प्रभाव; मंदिर बंद असल्यामुळे आर्द्रता घटली

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कोरोनामुळे गेल्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात लॉक डाऊन आहे. यामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांसह, मॉल्स देखील बंद आहेत. तसेच या लॉक डाऊन आधीच खबरदारी म्हणून सर्व मंदिरं व प्रार्थना स्थळे बंद करण्यात आले होते.

एप्रिल महिन्यात सुट्टयांमुळे सर्वच मंदिरात गर्दी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्व पर्यटनस्थळांसह तीर्थक्षेत्रे देखील ओस पडली आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेले महालक्ष्मी मंदीर देखील बंद आहे. यामुळे मंदिरातील प्रचंड बदलेली आर्द्रता कमी झाली आहे. काही वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया पुरातत्व खात्याकडून करण्यात आली होती. मूर्ती संवर्धनासाठी मंदिरातील आर्द्रता कमी असणे आवश्यक होते. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाकडून उपाययोजना देखील करण्यात आल्या होत्या.

सध्या, मंदिरातील आर्द्रता हि ५० च्या खाली गेली आहे, जी सामान्यतः ७५ च्या वर असते. आजपर्यंत मंदीर इतक्या काळ बंद नव्हते. मात्र, आर्द्रता कमी झाल्याने चांगला प्रभाव निर्माण झाल्याचे देवस्थान अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

कोल्हापुरात देखील कोरोनाचे काही रुग्ण आढळून आले होते, त्यामुळे शहरात कडकडीत बंद पाळला जात असून सार्वजनिक ठिकाने बंद आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!