Share

माणुसकी हरवली : गरोदर हत्तिणीनंतर आता गर्भवती गायीला खाऊ घातले फटाके

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : केरळमधील गरोदर हत्तिणीला अननसातून फटाके खाऊ घातल्याने तिचा मृत्यू ओढवला होता. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये असाच भयंकर प्रकार एका गर्भवती गायीसोबत घडला होता. या दोन्ही घटनांनी प्रचंड जनक्षोभ उसळला होता. आता हिमाचल प्रदेशमधील गायीच्या प्रकरणातील आरोपीला अटक झाल्याचं वृत्त आहे.

खबरदार हलगर्जीपणा केला तर, अजितदादांनी खासगी रुग्णालयांना भरला दम

या घटनेतील गायीच्या जबड्याला गंभीर इजा झाली आहे. या जखमी गायीचा एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गायीचा मालक गुर्दील सिंग याने त्याचा शेजारी नंदलाल याच्यावर गायीला जाणूनबुजून इजा पोहोचवल्याचा आरोप केला होता. तसेच या घटनेपासून नंदलाल हा फरार असल्याचे गुर्दील याने सांगितले होते. त्या फरार आरोपी नंदलाल याचा शोध लागला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आता ठरणार कोरोना चाचण्यांचे दर, खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांचे दर निश्चितीसाठी समिती गठीत

दुसरीकडे, या जखमी गायीवर उपचार सुरू आहेत. तिने एका वासराला जन्म दिला आहे. तिच्या जबड्याला जबर दुखापत झाली असून तिथली हाडं मोडली आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!